जिवे मारण्याची देत डॉक्टरला साताऱ्यात खंडणीची मागणी

सातारा – कामाक्षी हॉस्पिटलचे संचालक डॉ. नीलेश विठ्ठलराव थोरात (रा. प्रभुकृपा बिल्डिंग, सदरबझार, सातारा) यांना जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. थोरात यांनी अज्ञातांविरोधात फिर्याद दिली आहे. या साताऱ्याच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी, डॉ. नीलेश थोरात यांच्या पत्नी डॉ. रश्‍मी या 21 जानेवारी रोजी कामाक्षी हॉस्पिटलमध्ये बसल्या असता, त्यांच्या मोबाइलवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. तुझ्या नवऱ्याचे एका मुलीशी अफेअर सुरू आहे. आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन समोरच्या व्यक्‍तीने फोन ठेवला. त्यानंतर त्याच नंबरवरून डॉ. रश्‍मी यांना 12 रोजी पुन्हा कॉल आला. तुझ्या नवऱ्याला व कुटुंबीयांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत संशयितांनी खंडणी मागणारा मेसेज पाठवला. या प्रकाराने घाबरलेल्या डॉक्‍टर दाम्पत्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हवालदार संतोष इष्टे तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.