दिशाला सलमान बरोबर पुन्हा कामाची संधी नाही

दिशा सध्या सलमानबरोबरच्या “भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण सलमानबरोबर काम करण्याची संधी मिळू शकेल, असे तिला वाटत नाही. तिला असे का वाटते त्याचे कारण देखील तिने सांगितले आहे. “भारत’चे डायरेक्‍टर अली अब्बासनी तिला एक रोल ऑफर केला. केवळ सलमानबरोबर काम करायला मिळणार म्हणून तिने हा रोल स्वीकारला. हा रोल म्हणजे स्पेशल ऍपिअरन्स होता. त्यासाठी तिने खूप ट्रेनिंग घेतले, सराव देखील केला.

अली अब्बासनी जेंव्हा तिला “भारत’ची स्क्रीप्ट ऐकवली तेंव्हा तिला सलमानच्या अपोझिट रोल न देण्यामागचे कारणही सांगितले. हे कारण ऐकून दिशाला कळून चुकले की तिला आता सलमान खानबरोबर पुन्हा कधीही काम करण्याची संधी मिळू शकणार नाही. हे कारण म्हणजे. सलमान आणि दिशाच्या वयामधील अंतर हे आहे. हे अंतर आता कधीही कमी होऊ शकणार नाही. त्यामुळे हे कारण नाकारण्यात काहीच अर्थ नाही.

सलमान एक अवलिया आहे. तो फार कष्टाळू आहे. त्याच्या वयापेक्षा खूपच यंग वयातले रोल तो सहज करतो. त्याच्याकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. तिच्या दृष्टीने एका अर्थी “भारत’ हा एक स्पेशल सिनेमा असणार आहे. कारण यापूर्वी तिने यासारखा सिनेमा केलेलाच नव्हता. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे तिला सलमानबरोबर काम करताना पडद्यावर बघितले जाणार आहे. दोघांमधील केमिस्ट्रीबाबत देखील ती खूप खूष आहे. सलमानबरोबर कामाची संधी मिळण्याची तिने पूर्वी अपेक्षाही केलेली नव्हती. त्याच्याबरोबर एक गाणेही करायला मिळाल्याने ती स्वतःला लकी मानते.

Leave A Reply

Your email address will not be published.