‘भाजपकडून मराठा आरक्षणावर चर्चा खूप झाली आता कृती करून दाखवा!’

मुंबई: मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभरात आंदोलन सुरु असून अनेक राजकीय पक्षांनी मराठा मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणावर भाजप-सेना सरकारला चर्चेचे गुऱ्हाळ खूप झाले आता कृती करून दाखवा, असे आवाहन केले आहे.

मराठा समाज विरुद्ध इतर समाज असा संघर्ष पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. मराठा आंदोलनाशी चर्चा करण्यासाठी सरकारची कोणीही व्यक्ती पुढे आली नाही. मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठा आंदोलन चिघळले. या चिघळलेल्या आंदोलनाला सेना-भाजप सरकारच जबाबदार, असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा असून आंदोलकांनी शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं, जेणेकरून सामान्य माणसांना त्याचा त्रास होऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

https://twitter.com/INCMaharashtra/status/1022098803715796992

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)