कृष्णविवराच्या पहिल्या छायाचित्राचा शोध

आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिध्दांताचा आणखी एक पुरावा

पुणे – आंतरराष्ट्रीय पातळीवरील संयुक्त सहकार्याने चालू असलेल्या संशोधन गटाने ऐतिहासिक शोधाची घोषणा करताना मिसायर 87 या दूरवरच्या दीर्घिकेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गारगणटूआ कृष्णविवराची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. इव्हेंट हॉरीझॉन टेलीस्कोप (इएजटी) मध्ये संपूर्ण पृथ्वीवर भूमिस्थित असे रेडिओ दुर्बिणींचे जाळे असून त्या आधारे ही घोषणा करण्यात आली.

एकाच वेळी ब्रुसेल्स, सॅंटियागो, तैपेई, टोकियो, वॉशिंग्टन अशा जगभरातील विविध शहरातील वैज्ञानिक संशोधन संस्थांमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा करण्यात आली. दी ऍस्टाफिजीकल जर्नल लेटर्स या संशोधन नियतकालिकाच्या विशेष अंकामध्ये आज सहा संशोधन निबंध प्रसिद्ध झाले त्याद्वारे हे ऐतिहासिक शोध जाहीर करण्यात आले. या छायाचित्रामध्ये मिसायर 87 [1] या दीर्घिकेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराला दाखविण्यात आलेले आहे. ही दीर्घिका व्हिर्गो या दीर्घिका समूहातील आहे. पृथ्वीपासून हे कृष्णविवर 55 दशलक्ष वर्ष दूर असून त्याचे वजन आपल्या सूर्यमालेतील सूर्याच्या 6.5 अब्ज पटीएवढे आहे.

इएजटी संशोधन प्रकल्प हे पृथ्वीवरील दुर्बिणींना एकत्र जोडून पृथ्वीच्या आकाराची एकच मोठी दुर्बीण घडवण्यात यशस्वी झाले. यामध्ये असाधारण संवेदनशीलता आणि रिझॉल्युशन आहे. अनेक वर्षांच्या अथक अशा आंतरराष्ट्रीय गटाच्या सांघिक प्रयत्नांतून हे निष्कर्ष हाती आले असून यातून विश्वातील अतिदूर खगोलीय वस्तूंचा अभ्यास करणे आता शक्‍य होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन 1919मध्ये जेव्हा आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिद्धांतांची पहिल्यांदा चाचणी आर्थर एडिंग्टनने घेतली होती त्याच्या शतकपूर्ती वर्षामध्येच हा शोध लागला आहे. संशोधन गटाने आज हे सुद्धा जाहीर केले कि या निष्कर्षानुसार आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत खरा ठरला आहे.

खगोलशास्त्र केंद्र, हार्वर्ड विद्यापीठ आणि स्मिथसोनियन, अमेरिका येथे कार्यरत प्रकल्पाचे संचालक शेफर्ड डोलेमन यांनी आज ही घोषणा अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फौंडेशन च्या पत्रकार परिषदेत केली. “जगभरातील संशोधकांनी साध्य केलेली असाधारण कामगिरी आहे”, असं ते म्हणाले. कृष्णविवरे ही विश्वातील असाधारण खगोलीय वस्तू आहेत ज्याचे वस्तुमान महाप्रचंड असते परंतु आकार अतिशय छोटा असतो. त्यांच्या या अतिविशिष्ट गुणधर्मांमुळे स्थळ-काळ यांचे मोजमाप करण्याचे सर्व परिमाण वक्र होतात आणि त्याच्या आजूबाजूचे सर्व पदार्थ आत-उष्णतेमुळे असाधारण तापमानापर्यंत जाऊन पोचतात.

वेळोवेळी केल्या गेलेल्या विविध मोजमापांमधून वेळोवेळी केल्या गेलेल्या त्यासंबंधित वैज्ञानिक प्रतिमा विकसित करण्याच्या सातत्यपूर्ण पद्धतीमधून चित्राच्या मध्यभागी कृष्णविवराची छाया असलेला परंतु त्याभोवती प्रकाशमान अशी रचना असलेली एका कडीसदृश्‍य अशी ही प्रतिमा हे आजच्या शोधाचे वैशिष्ट्य आहे. एकदा ही छाया मिळाल्यानंतर सातत्यपूर्ण अशा संगणकीय मॉडेल्समधून वक्र झालेल्या स्थळ-काळाचा तसेच त्या कृष्णविवराच्या भोवती असलेल्या तापमानाचा आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करून ही आजची शेवटची प्रतिमा प्राप्त झाली आहे असे पूर्व आशिया वेधशाळेचे संचालक टी. पी. पॉल यांनी सांगितले.

इएजटी दुर्बिणींचे जाळे उभे करणे हे महाप्रचंड काम होते. समुद्रसपाटीपासून खूप मोठ्या उंचीवर स्थापित या सर्व दुर्बिणी एकमेकांशी जोडल्या जाऊन त्यांच्यामार्फत निरीक्षणे नोंदवणे हे त्यातील आणखी एक मोठे आव्हान होते. दुर्बिणी ज्या ठिकाणी स्थापित केल्या गेल्या त्यामध्ये अमेरिकेतील हवाई बेटे, अमेरिकेतील ऍरिझोना भागातील पर्वते, स्पेन मधील सिएरा नेवाडा, मेक्‍सिकोतील उंच ठिकाण, चिलीमधील अटॅकामा वाळवंट आणि दक्षिण ध्रुवावरील अंटार्क्‍टिका या ठिकाणांचा समावेश होतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.