पार्किंग व्यवस्थेमुळे वाहनांची गैरसोय टळली

चारही बाजूंच्या रस्त्यावर नो पार्किंग

कर्मचाऱ्यांसह, कार्यकर्त्यांची झडती

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्त्यांना व निवडणूक मतमोजणी संदर्भात खाजगी कामगार यांना सकाळीच प्रवेश देण्यात आला. त्यांच्याकडील प्रवेश पत्र, ओळखपत्राची (निवडणूक अधिकारी यांनी दिलेले) खात्री करुन व अंगझडती घेवून कर्मचाऱ्यांना जिमखाना येथील बॅरेकेटींग गेटमधुन प्रवेश देण्यात आला. त्यांच्याकडून मोबाईल, पेन, कागदपत्रे गेटवरच सुरक्षा रक्षकांनी काढून घेतले. त्यामुळे कार्यकर्तेसह कर्मचारी ही त्रस्त झाले होते.

नगर  – लोकसभेची मतमोजणी नगर एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात गुरुवारी झाली. यापार्श्‍वभूमीवर वाहतूकीच्या दृष्टीने प्रशासनाने एमआयडीसी परिसरात विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्थेमुळे वाहनांची गैरसोय टळली. निवडणूक मतमोजणी संबधीत अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, निवडणूक संबधीत खाजगी कामगार यांच्यासाठी सनफार्मा विद्यालयात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.

तर सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी तसेच मतमोजणी प्रतिनिधी व कार्यकर्त्यांची पार्किंग व्यवस्था रेणुका माता मंदिर परिसरात व रामराव चव्हाण विद्यालयातील मैदानात करण्यात आली होती. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची पार्किंग व्यवस्था एमआयडीसी येथील एल ऍण्ड टी कंपनीच्या प्रांगणात करण्यात आली होती. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी नागरिकांनी वहाने लावण्यासाठी गौरसोय झाली नाही. तसेच एमआयडीसी परिसतात विविध ठिकाणी व महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे चारही बाजूंच्या रस्त्यावर नो पार्किंग व नो हॉल्टींग झोन तयार करण्यात आले होते. नागापूर-निंबळक, एल ऍण्ड चौक रस्त्यावर बॅरीकेडींग लावण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.