“दिग्दर्शकाने मला कपडे काढायला सांगितले अन्…” अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई – बॉलिवूडमध्ये जम बसविण्यासाठी सर्वांनाच मोठी मेहनत घ्यावी लागते. आजवर अनेक दिग्ज सेलिब्रिटींनी चित्रपटसृष्टीतील आपल्या संघर्षमयी प्रवासाचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. छोट्या शहरातून आलेल्यांना इथे लवकर स्विकारलं जात नाही शिवाय त्यांना तिथं कास्टिंग काउचं शिकार होयला लागत.

‘कहीं है मेरा प्यार’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेले अभिनेत्री ‘ईशा अग्रवाल’ने आपल्या सोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. “मी लातूर सारख्या लहान शहरातून आलेय. त्यामुळे मुंबईत नाव कमवणं खूप कठीण आहे. खास करून ग्लॅमरस क्षेत्र आणि अभिनय क्षेत्रात. या क्षेत्रात खूप मेहनत आहे. तसंच लहान शहरातून आलेल्यांना इथे लवकर स्विकारलं जात नाही शिवाय कास्टिंग काउच आहे.”

ईशा पुढे म्हणते.. एका चित्रपटातील भूमिकेसाठी दिग्दर्शका बरोबर माझी चर्चा सुरु होती. बराच वेळ आम्ही एकत्र चर्चा केली. त्यानंतर दिग्दर्शकाने अचानक मला माझे कपडे काढायला सांगितले जेणे करून तो माझी फिगर पाहू शकेल. चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्याला माझी फिगर पाहणं गरजेचं होत असं तो मला म्हणाला…’ यावेळी माझी बहीण देखील माझ्या बरोबर होती.

आम्ही त्यावेळी तेथून निघून गेलो… मात्र, हा प्रकार एवढ्यातच थांबणार न्हवता तर, त्यानंतर बरेच दिवस तो मला मेसेज आणि फोन करत होता. अखेर मी नंतर त्याला ब्लॉक केलं…” असं ईशा म्हणाली. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान ईशाने हा खुलासा केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.