पीएमसी बँकेचे संचालक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

मुंबई: पीएमसी बँकेचे संचालक सुरजित सिंग अरोरा यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालयात त्यांची चौकशी सुरू आहे.

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी बँक) सध्या टाळे ठोकण्याच्या तयारीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले असून सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बँक आर्थिक डबघाईला आल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला. यामुळे खातेदार बँकेत जमले असून कर्मचाऱ्यांसोबत वाद चालू आहे.

दरम्यान,पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या बॅंकेत ठेवी ठेवणारे 59 वर्षीय फत्तोमल पंजाबी यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. गेल्या 24 तासात घडलेली ही दुसरी घटना आहे. सोमावारी 51 वर्षीय संजय गुलाटी यांचाही मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनी या बॅंकेत 90 लाख रुपयाच्या ठेवी ठेवल्या होत्या. बॅंकेच्याविरोधात झालेल्या निदर्शनात ते सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.