आमच्यामध्ये मतभेद कायमस्वरूपी नाहीत

अप्पासाहेब जगदाळे : शेटफळ हवेलीत राष्ट्रवादीचा मेळावा

रेडा – शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही. जर अजित पवार यांचा फोन आला तर “त्यांच्यासाठी काही पण’… आमच्यामध्ये मतभेद कायमस्वरूपी नाहीत, असे प्रतिपादन इंदापूर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी केले.

शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरेदी-विक्री संघाचे छगन भोंगळे होते.

यावेळी बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, अशोक घोगरे, छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप, भाऊसाहेब सपकाळ, संजय निंबाळकर, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय शेंडे, गणेश झगडे, किरण बोरा, तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगदाळे म्हणाले, 2009 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बंडखोरी करून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दत्तात्रय भरणे यांना उभे केले होते. त्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरणेंचा पराभव झाल्यानंतर सर्वच कार्यकर्ते निराश झाले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक घोषित झाली. त्यावेळी भरणे हे कळस – वालचंदनगर जिल्हा परिषद गटातून निवडून आले. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते, असे जगदाळे यांनी यावेळी नमूद केले.

अशोक घोगरे यांनी प्रास्ताविक केले. यशवंत माने, संजय निंबाळकर, किरण बोरा, गफूरभाई सय्यद, तेजसिंह पाटील, भाऊसाहेब सपकाळ, गणेश झगडे आदींनी मनोगत व्यक्‍त केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.