बॉलीवूड किंग शाहरुख खानचे घर मन्नत काही आठवड्यांपूर्वी खूप चर्चेत होते. या चर्चेचे कारण होते त्यांच्या घराची नवीन नेमप्लेट. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या घरातील अनेक नवीन प्लेट्सचे फोटोही शेअर केले होते. नेमप्लेटची किंमत सुमारे 25 लाख रुपये असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, आता शाहरुख खानच्या घराची नवीन नेमप्लेट काढून टाकण्यात आली आहे. शाहरुखच्या टीमने ही नेमप्लेट तात्पुरती काढून टाकली आहे. काढण्यामागील कारण म्हणजे नेमप्लेटमध्ये जडलेला एक हिरा खाली पडला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,“नेमप्लेटमधून एक हिरा पडला आणि त्यामुळे नेमप्लेट दुरुस्तीसाठी काढण्यात आली आहे. ही नेमप्लेट घराच्या बागेत ठेवण्यात आली असून ती दुरुस्त केल्यानंतर पुन्हा मन्नतच्या बाहेर लावली जाईल. ही नेमप्लेट शाहरुखची पत्नी गौरीने डिझाइन केली होती.’
घराची सजावट आणि डिझाईनिंगबाबत गौरी खानच निर्णय घेत असते. काही दिवसांपूर्वी जेव्हा हि नेमप्लेट बसवण्यात आली त्यावेळी चाहत्यांनी या नेमप्लेटला पसंती दर्शवली होती.
शाहरुख खान मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात राहतो. जगभरातील चाहते घरासमोर फोटो काढण्याच्या आणि किंग खानला पाहण्याच्या आशेने ‘मन्नत’कडे गर्दी करतात. अलीकडेच, ईदच्या निमित्ताने शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते मन्नतच्या बाहेर जमले होते. घराबाहेर चाहत्यांची गर्दी झाली होती.