बारामती : बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर धनगर बांधवांनी ढोल बजाओ आंदोलन केलेय. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील धनगर बांधव आक्रमक झाला आहे. आज महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या वतीने आचारसंहिता लागू होणार आहे.
ही आचारसंहिता लागण्या अगोदर महाराष्ट्रातील धनगर बांधवांना अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करावं अशी मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थाना समोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आलेय..
आज निर्णय नाही झाल्यास मताच्या पेटीतून धनगर बांधव या सरकारला त्याची जागा दाखवून देईल असा खरमरीत इशारा धनगर बांधवांनी सरकारला दिला आहे.