पारगाव,(वार्ताहर) – “विकास काय असतो हे दिलीप वळसे पाटील यांनी दाखवून दिले.आंबेगाव शिरूर मतदार संघात प्रत्येक गावामध्ये कोट्यावधींची विकासकामे वळसे पाटलांनी मार्गी लावली आहेत. महाराष्ट्राच्या पटलावर आंबेगाव तालुक्याचे नाव पोहोचविण्याचे काम मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच केले. असे गौरवोद्गार म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंगळवार, दि. २९ रोजी काढले.
पारगाव (ता. आंबेगाव) येथे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत माजी खासदार शिवाजीराव बोलत होते. यावेळी विवेक वळसे पाटील, विष्णूकाका हिंगे, अरुणराव गिरे, अजय आवटे, शिवाजीराव ढोबळे, बाबासाहेब खालकर, शैलजा ढोबळे, दौलत लोखंडे, रामचंद्र ढोबळे, अजित चव्हाण, बाळासाहेब घुले,
ज्ञानेश्वर लोखंडे, रामहरी पोंदे, दत्ताराम वैद्य, प्रियंका लोखंडे,विठ्ठल ढोबळे, सुगंध पोंदे, प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पुढे म्हणाले ” लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. मतदारसंघातील जनतेने केवळ भावनांच्या आहारी जाऊन या खासदारांना निवडून दिले. “त्यांनी संविधान धोक्यात आहे.
आरक्षण जाणार आहे. असे सांगून फसवले. निवडून आल्यावर आता त्यांनी खासदार निधी किती आणला ? गेल्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक गावात काय परिस्थिती आहे. हे मतदारांनी पहावे. मंत्री वळसे पाटलांवर एकही रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही.
त्यांची आंबेगाव तालुक्यालाच नव्हे तर राज्याला गरज आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. विरोधकांकडे केवळ अपप्रचार, निंदा नालस्ती हाच विषय आहे. तालुक्याला वळसे पाटलांचे नेतृत्व हवे आहे.
यावेळी उमेदवार दिलीप वळसे पाटील, अरुण गिरे, भाग्यश्री कोल्हे, शिवाजीराव ढोबळे, माजी सरपंच बबनराव ढोबळे, चंद्रकांत लोखंडे, सार्थक ढोबळे आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू ढोबळे यांनी केले.