वाहनांच्या नोंदणी कागदपत्रातील तपशील वाढणार; मोटार वाहन नियमात दुरुस्त्या

नवी दिल्ली, दि. 24- केंद्र सरकारने मोटार वाहन नियमात दुरुस्ती केली आहे. याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार आहे. या दुरुस्त्यानुसार वाहनांच्या नोंदणी कागदपत्रांमध्ये वाहन मालकाच्या माहीतीच्या तपशिलात वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींना मदत होणार आहे.
वाहनांच्या नोंदणी कागदपत्रात वाहनधारकांचा तपशील पुरेसा नसल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना अडचणी येत असल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला मिळाल्यानंतर नियमांमध्ये आवश्‍यक त्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहन नोंदणीवेळी आता वाहनधारकांचा अधिक तपशील संकलित होणार आहे.
यामध्ये स्वायत्त संस्था, केंद्र सरकार, चारीटेबल ट्रस्ट, चालक प्रशिक्षण संस्था, दिव्यांग जन, शैक्षणिक संस्था, स्थानिक संस्था, एकापेक्षा अनेक मालक, पोलीस विभाग अशा माहितीचा समावेश असेल.
दिव्यांग व्यक्तीला जीएसटीमध्ये आणि इतर योजनांमध्ये काही सवलती दिल्या जातात. नोंदणी कागदपत्रात स्पष्ट उल्लेख असल्यानंतर या सवलती दिव्यांग व्यक्तीला उपलब्ध होऊ शकणार आहेत. आतापर्यंत दिव्यांग व्यक्तीची माहिती कागदपत्रात नसल्यामुळे या सवलती मिळविताना अडचणी येत होत्या. आता ही अडचण दूर होणार आहे.
………..

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.