मंत्रालयातील लिफ्टमॅनचा पगार ऐकून उपमुख्यमंत्री झाले अस्वस्थ; म्हणाले,…

मुंबई : मुंबईतील मंत्रालयात दररोज मंत्र्यांसह शेकडो लोकांची  ये-जा होत असते. यावेळी मंत्रालयातल्या लिफ्टचाही तेवढ्याच प्रमाणात वापर होत असतो.  याच  मंत्रालयातील लिफ्टमधून वर जात असतानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक किस्सा समोर आला असून त्यातून त्यांची सर्वसामान्यांविषयी असणारी  आपुलकी पुन्हा एकदा समोर आली आहे.

अजित पवार नवीनच उपमुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी ते मंत्रालयातल्या लिफ्टमधून वर जात होते. त्यावेळी अजित पवारांनी लिफ्टमधल्या लिफ्टमनला त्याचा पगार विचारला. काय किती पगार मिळतो तुला अशी विचारणा त्यांनी लिफ्टमनला केला. त्यावर लिफ्टमन म्हणाला, साहेब आठ हजार मिळतात. हे ऐकताच अजित पवार अस्वस्थ झाले.

कामगारांना 15 हजार रुपये किमान वेतन असलं पाहिजे असा कायदा आहे. असा कायदा असतानाही चक्क मंत्रालयातल्या लिफ्टमनला फक्त 8 हजार रुपये कसे मिळतात, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. त्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांना यासंबंधीची माहिती घेण्यास सांगितले.

एका वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात लिफ्टमन, सफाई कामासाठी मनुष्यबळाचे कंत्राट दोन कंपन्यांना देण्यात आले आहे. त्या कामगारांना किती पगार देतात, सरकार कंपन्यांना प्रत्येक कामगारामागे किती पैसा देते याची विसंगती पुढे शोधण्यात आली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.