अस्मिताच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची ग्रामस्थांची मागणी

पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा

वाई  – कोंढावळे, ता. वाई येथील कु. अस्मिता सुरेश कोंढावळे या विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन शुक्रवारी कोंढावळे, किरूंडे, वाशिवली येथील ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन एडगे यांना दिले. 9 मार्च पर्यंत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे न सोपविल्यास 10 मार्च रोजी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशाराही निवेदनात देण्यात आला आहे. याप्रकरणी काही संशयीतांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

यावेळी पिडीत मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळावा व संबंधितांवर कठोर कारवाही करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य विक्रांत डोंगरे, पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह नायकवडी, युवा नेते विकास शिंदे, चंद्रकांत शेलार, अशोक मांढरे, मारूती चोरट यांनी केली. सोमवार दि. 18 फेब्रुवारी रोजी अस्मिता सायंकाळी किर्तनासाठी वाशिवली येथे गेली होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. दि. 21 रोजी दुपारी 3 च्या सुमारास धोम जलाशयामध्ये तीचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी काही घातपात झाला असल्याची शक्‍यता तीच्या नातेवाईकांनी व्यक्त केली होती. आज दुपारी 2 च्या सुमारास पश्‍चिीम भागातील ग्रामस्थांनी मोठया संख्येने पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. यावेळी पोलीस प्रशासनास ग्रामस्थांच्या सहयांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गुरूवार दि. 21 रोजी दुपारी 3 वाजता धोम जलाश्‍यात कु. अस्मिता सुरेश कोंढाळकर हीचा संशयास्पद मृतदेह सापडला हा मृत्यू तिच्यावर अत्याचार करून खून केल्याचे दिसून येते. त्या संदर्भात वाई पोलिसस्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक बबनराव येडगे तपास करीत आहेत. याप्रकरणी ग्रामस्थांनी काही संशयीतांचे नावे त्यंना दिली असताना त्या व्यक्तीस हजरही केलेले नाही. अशाच प्रकारे दहा महिन्यांपुर्वी मौजे वडवली येथे 8 वर्षाच्या मुलीचा असाच संशायास्पद मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. याप्रकरणी आपण तातडीने लक्ष घालून हा तपास सीबीआयकडे सोपावावा असे न झाल्यास 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता वाई पोलीस स्टेशन समोर आंदोलन केले जाईल व होणार्यो परिणामास प्रशासन जबाबदार राहील.

निवेदनावर महेंद्र पुजारी सुनिल गोळे, प्रभाकर सणस, नारायण वाडकर आदींसह सुमारे शंभर ग्रामस्थांच्या सहया आहेत. निवेदणाच्या प्रती मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विभागीय विशेष महानिरिक्षक, पोलीस अधिक्षक यांना पाठविण्यात आल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.