सीमापलीकडेही भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याची मागणी 

वॉशिंग्टन – भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडरला सोडण्याची विनंती आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार भुट्टो यांची नात आणि लेखिका फातिमा भुट्टो यांनी इमरान खान सरकारला केली आहे. मी आणि अनेक पाकिस्तानी तरुण आपल्या देशाला विनंती करतात कि, शांती, मानवता आणि प्रतिष्ठेसाठी भारतीय वैमानिकाला सुखरूप सोडण्यात यावे, असे फातिमा भुट्टो यांनी म्हंटले आहे.

भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकनेही भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय वायुसेनेने पाकचा प्रयत्न हाणून पाडला. परंतु, यावेळी मिग-२१ हे भारतीय लढाऊ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले. यामधील विंग कमांडर अभिनंदन यांना जिवंत पकडल्याची दावा पाकिस्तानने केला आहे. या पार्श्वभूमीवर फातिमा भुट्टो यांनी न्यूयॉर्क टाइम्समधील लेखात अभिनंदन यांना सोडण्याची विनंती पाकिस्तान सरकारला केली आहे.

https://twitter.com/fbhutto/status/1100837057394626561

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)