कचरा, नाले साफसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी

पिंपरी – शहरातील कचराकुंड्या भरभरून वाहात असून, पावसाळा सुरू होण्यास महिनाभराचा कालावधी बाकी आहे. शहराचे सार्वजनिक आरोग्य चांगले ठेवायचे असले, तर कचरा वेळेवर उचलावा. तसेच नाल्यांच्या साफसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी महापालिका आयुक्‍तांकडे केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सध्या ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. कचराकुंड्या भरभरून वाहात आहेत. तसेच शहरातील मोकळ्या जागेतसुध्दा मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. कचऱ्याचे व्यवस्थित नियोजन न करण्यात आल्याने कचरा वाढू लागला आहे. तसेच कचरा वेळोवेळी उचला जात नाही.

येत्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्‍यता पाहता त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरून रोगराई होण्याची शक्‍यता नाकरता येत नाही. शहरातील पवना नदीच्या पुलावर निर्माल्य टाकण्यासाठी ठेवलेले निर्माल्य कुंडदेखील भरुन वाहत आहे. तसेच आता महिनाभरानंतर पावसाळा सुरु होत आहे. परंतु अद्याप शहरातील नाले सफाई पूर्ण झालेली नाही. शहरातील ओढे, नाले याची वेळेवर साफ सफाई झाली नाही तर पावसाचे पाणी या नाल्यांमध्ये तुंबून लोकवस्ती घुसण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे वित्त व जीवित हानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील सर्व ओढे, नाले व गटारांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याची मागणी या निवेदनात केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.