“बायोफोकल’साठी एक संधी देण्याची मागणी 

पुणे – अकरावी प्रवेशासाठी द्विलक्षी (बायोफोकल) अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार तब्बल 7 हजार 264 द्विलक्षीच्या जागा रिक्‍त राहिले असतानाही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी घेऊन प्रवेशाची संधी उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.

अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. त्याचाच पहिला भाग म्हणून प्रथमत: द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी एकूण जागा 10 हजार 60 इतकी आहे. त्यासाठी प्राप्त अर्जाची संख्या 4 हजार 762 एवढी आहे. त्यापैकी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 2 हजार 796, तर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी 1 हजार 966 आहे. एकूण प्रवेशाची रिक्‍त जागांची संख्या 7 हजार 264 आहे. जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. मात्र एकूण रिक्‍त जागा पाहता या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करणे अपेक्षित होते. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या आणखी एक प्रवेश फेरीतून ह्या रिक्‍त जागांची संख्या कमी झाली असती. याबाबत अकरावी प्रवेश समितीकडून दुर्लक्ष होत असून, त्याचा फटका द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असती. मात्र प्रवेश समितीने प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याच्या अट्टहासात द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करीत असल्याची भावना निर्माण होत आहे. या विद्यार्थ्यांनी केंद्रीय पद्धतीच्या नियमित फेरीतून प्रवेश मिळाला तरी महाविद्यालयांकडून त्यांना बायोफोकल हा विषय मिळेल, असे नाही. त्यामुळे द्विलक्षी अभ्यासक्रम पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अकरावी प्रवेश समितीवर नाराजी दर्शविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)