नवी दिल्ली – गेले बरेच दिवस लांबणीवर टाकण्यात आलेली दिल्ली महापालिकेची निवडणूकही आता जाहीर करण्यात आली आहे. वास्तविक या निवडणुका या आधीच होणार होत्या. परंतु पंजाबात आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर दिल्ली महापालिकेच्या जाहीर झालेल्या निवडणूका आयत्यावेळी रद्द करण्यात आल्या.
दिल्लीतील तीन महापालिकांचे एकत्रिकरण करून या तीन महापालिकांची एकच महापालिका स्थापन करण्यात आली आहे. या एकत्रित महापालिकेच्या एकूण 250 जागा असून त्यासाठी 4 डिसेंबरला मतदान होणार असून 7 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
We completed the delimitation process in Delhi. Polling stations were redrawn. Now we are prepared for 250 wards in Delhi. Municipal corporation of Delhi has jurisdiction in 68 constituencies. 42 seats reserved for SCs:Vijay Dev, Delhi State Election Commissioner pic.twitter.com/yv2GJFPqmT
— ANI (@ANI) November 4, 2022
250 पैकी 42 जागा अनुसुचित जातींसाठी आरक्षित असतील. तर एकूण जागांपैकी 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. दिल्ली महापालिकेसाठी 1 कोटी 46 लाख 73 हजार 847 मतदार आहेत. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीबरोबरच दिल्ली महापालिकेच्या निवडणूका घेण्यामागे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतच गुंतवणूक ठेवण्याचे भाजपचे धोरण आहे असाही दावा केला जात आहे.
Tips : कार विकण्याच्या तयारीत आहात? ‘या’ 5 पद्धतींनी मिळेल जास्त किंमत !
दिल्लीचे निवडणूक आयुक्त डॉ. विजय देव यांनी या मागे कोणतीही राजकीय खेळी असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की गुजरातच्या निवडणूका मुख्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर केल्या जातात तर दिल्ली महापालिकेच्या निवडणूका राज्य निवडणूक आयोगातर्फे जाहीर केल्या जातात.