धक्कादायक! गोली मारो सालों को मोर्चाला दिल्ली पोलिसांची परवानगी

नवी दिल्ली : “”देश के गद्दारों को, गोली मारो सालों को’ या घोषणेसह काढण्यात येणाऱ्या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दिल्ली पोलिसांच्या या परवानगीचे पत्रच साकेत गोखले या कार्यकर्त्याने समाज माध्यमांत पोस्ट केल्याने खळबळ उडाली आहे.

जामिया येथे रामभक्त गोपाल या तरूणाने गोळीबार करण्याच्या घटनेला 52 तासही उलटले नाहीत. या घटनेत शाबाद हा तरूण जखमी झाला होता. तेथे उभे असणाऱ्या पोलिसांनी गोळीबार थांबवण्यासाठी काहीही केले नाही असे घटनास्थलावरील चित्रिकरणात स्पष्ट दिसत आहे. त्यातच शाहीनबाग येथे निदर्शकांच्या जवळ गोळीबार करण्यातआला आहे. या पार्श्‍वभूमी आपल्याच देशातील नागरिकांना गोळ्या घालण्याच्या घोषणांसह राजधानीच्या रस्त्यांवर मोर्चाला दिलेल्या परवानगीने दिल्ली पोलिसांचा धार्मिक दृष्टीकोन उघड होत असल्याचा आरोप होत आहे.

काही दिवसांपर्वी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेला गोळीबार आणि लाठीमार अजून लोक विसरले नाहीत. अभाविपवर आरोप केला गेलेल्या बुरखाधारी गुंडाचा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हैदोसही लोक विसरले नाहीत.

गोखले यांनी दावा केला आहे की, संसदमार्ग पोलिस ठाण्यात ते व्यक्तीश: गेले होते. त्यांना या मोर्चाला परवानगी दिली होती. मात्र त्यांतर सहाय्यक आयुक्तांचा फोन आला. त्यांनी आचारसंहिता सुरू असल्याने आठ तारखेनंतर मोर्चा काढा, असे सांगितले. आठ तारखेपर्यंत आचार संहिता आहे. त्यामूळे मोर्चाला अडचण होऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

जर दिल्ली पोलिसांच्या मते ही घोषणा जर आचार संहितेचा भंग आसेल तर भाजपा नेते अनुराग ठाकूर आणि कपिल मिश्रा यांना अद्याप अटक का झाली नाही असे सवाल त्यांनी केले आहेत. हा प्रकाराबाबत न्यायलयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्ली पोलिसांनी मला मला धक्कादायकरित्या देश के गद्दारों को, गोली मार सालों को या घोषणेसह काढण्यात येणाऱ्या मोर्चाला परवानगी दिलेलीआहे. मी संसद मार्ग पोलिस ठाण्यात गेलो त्यावेळी मला ही परवानगी देण्यात आली. यावेळी झालेले संभाषण असे होते, ते मला सातत्याने विचारत होते हा का कायद्या विरोधातील मोर्चा आहे का? मी सांगायचो, हा जातीयवादी शक्ती आणि जामिया येथे घडलेली घटना यांच्याशी संबंधित मोर्चा आहे. मी काल लिहले होते तसे हा जामियातील जातीयवादी शक्तींविरोधातील मोर्चा आहे. अन्यथा मोर्चा काढण्याचा माझा दुसरा कोणताही उद्देश नाही,असे गोखले यांनी लिहले आहे.

या वादग्रस्त घोषणेबाबत पोलिस कोणती भूमिका घेता हे मला लेखी हवे होते. ते या मोर्चाला परवानगी देणार नाहीत, असे मला वाटत होते. मात्र धक्कादायकरित्या त्यांनी ती परवानगी दिली.
मला एसीपी हॅक्‍स यांचा आता फोन आला. ते म्हणाले सध्या सुरू असणाऱ्या आचार संहितेमुळे ही घोषणा थोडी अडचणीत आणणारी आहे. त्यामुळे मला मोर्चा आठ फेब्रुवारीनंतर काढण्याचा सल्ला त्यांनी दिला. जर हे आचारसंहितेचे उल्लंघन असेल तर अनुराग ठाकूर आणि कपील मिश्रा यांना अद्याप अटक का झाली नाही? दिल्ली पोलिस हे कसे चालू शकेल?, असे सवालही त्यांनी केले.

संसद मार्ग (पोलिस ठाणे) : हे प्रकरण मी न्यायालयात घेऊन जाणार आहे. जर मान्यवरांनी त्यांना अशा स्वरूपाची घॅषणा देत काढलेल्या मोर्चाला संरक्षण देण्याचा आदेश दिला आहे का? हे त्यांना तेथे सांगावे लागेल. ते खूपच इंटरेस्टिंग असेल, असे गोखले यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.