करोनामुळं अनाथ झालेल्या मुलांचे पालकत्व दिल्ली सरकार स्वीकारणार

नवी दिल्ली – दिल्लीत लॉकडाउन आणि रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांचा वेळेवर पुरवठा होत असल्याने गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत समाधान व्यक्त करत मोठी घोषणा केली.

गेल्या 24 तासात 8 हजारांपेक्षा कमी करोना रुग्ण आढळल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. यावेळी करोनामुळे अनाथ झालेली मुले आणि निराधार वृद्धांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. अनाथ मुलांचे संगोपन आणि शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार करणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे.

करोनामुळे अनेक संसार उद्‌वस्त झाले आहेत. अनेक मुलांनी आपल्या आई वडिलांना गमावले आहे. तर वृद्ध दाम्पत्यांनी आपल्या कमवत्या मुलांना गमवल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यासाठी दिल्ली सरकारने एक पाऊल पुढे टाकत मदतीचा हात दिला आहे. अनाथ मुले आणि वृद्ध दाम्पत्यांचा खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे.

वृद्ध दाम्पत्यांचा कमवता मुलगा गेल्याने आता घर चालवण्यासाठी कुणी नाही. अशा कुटुंबांची मदत दिल्ली सरकार करणार आहे. काही मुलांनी आपल्या आई वडिलांना गमावलं आहे. त्या मुलांनी चिंता करू नये. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं केजरीवाल यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.