देशातील वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमीत्त पंतप्रधान मोदींनी व्यक्‍त केली चिंता

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अखिल भारतीय व्याघ्र गणना 2018 चा अहवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केला. दिल्लीत याविषयी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थितांना पंतप्रधानांनी संबोधित केले. भारत हा जगभरातल्या देशांमध्ये वाघांसाठी सुरक्षित देश मानला जातो. देशात एक था टायगरपासून टायगर जिंदा है पर्यंतचा व्याघ्र संवर्धनाचा प्रवास हा निश्‍चितच समाधानकारक आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

वाघांची संख्या वाढली असली तरीही त्यांच्या मृत्यूंबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली.

देशातील वाघांचे संरक्षण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पूर्ती झाली आहे. कारण नुकत्याच जाहीर झालेल्या व्याघ्र गणनेचा निकाल हा प्रत्येक भारतीयाला आनंद देणारा असाच असल्याचे मत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्‍त केले. वाघांची संख्या दुप्पट करण्याचे ध्येय आपण अमेरिकेच्या तुलनेत आधी पूर्ण केले आहे. एकट्या भारतात 3 हजार वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे आपण हे अभिमानाने सांगू शकतो की, जगात भारत हा वाघांसाठी सुरक्षित देश मानला जातो. तरीही देशातली वाघांची घटती संख्या हा चिंतेचा विषय आहे असे मोदींनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)