मोदींवरील चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर : निर्माते संदीप सिंग यांची माहिती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडणार आहे. याबाबत चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून माहिती दिली असून याबाबतची अधिक माहिती लवकरच देऊ असं त्यांनी म्हंटलं आहे.

तत्पूर्वी आज सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्याद्वारे ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास तयारी दर्शवली असून या याचिकेवर येत्या ८ तारखेला सुनावणी होणार आहे. यापूर्वी मुंबई व मध्यप्रदेश उच्च न्यायालयांद्वारे ही याचिका फेटाळण्यात आली होती.

जेष्ठ वकील अभिषेक मनू संघवी हे याचिकाकर्ते असलेल्या काँग्रेस नेते अमान पनवर यांची बाजू मांडत असून, हा चित्रपट निवडणुकांच्या काळात प्रसिद्ध झाल्यास त्याचा निवडणुकांच्या परिणामावर विपरीत परिणाम होईल असं मत याचिकाकर्त्यांनी मांडलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.