कॅन्टोन्मेंटच्या घंटागाडीत आढळले मृत अर्भक

देहुरोडमधील प्रकार : दोन महिन्यातील तिसरी घटना

पोलिसांनी देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयातील

डॉ. यामिनी अडबे यांच्या मदतीने रुग्णालयातील कागदपत्रे तपासले असता कचरा गाडी टाकण्यात आलेला अर्भक जीवनरेखा रुग्णालयातील असल्याचे सिद्ध झाले आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी रुग्णालयातील काही कागदपत्र ताब्यात घेतले आहेत. मागील दोन महिन्यांतील ही तिसरी घटना असल्याने देहुरोड शहरात खळबळ उडाली आहे. यापूर्वी गांधीनगर भागात गटारीमध्ये तसेच सार्वजनिक शौचालयात अर्भक आढळून आले होते.

देहूरोड  – देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कचरा गाडीत गुरूवारी (दि.27) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मृत अर्भक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत अर्भक आढळल्याची दोन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे.

देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या घंटागाडीत कचरा जमा करणारा कर्मचारी संदीप दनाणे याला मृत अर्भक आढळून आले. याबाबतची माहिती त्याने स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मृत अर्भक ताब्यात घेतले. चौकशीनंतर गाडीत टाकण्यात आलेला कचरा जीवनरेखा रुग्णालयाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

चार महिन्यांची गरोदर असलेली स्त्री गंभीर रक्‍तस्त्राव होत असल्याने गुरूवारी रूग्णालयात दाखल झाली होती. नवनियुक्त सफाई कर्मचाऱ्याने तिचे मृत अर्भक चुकून कचरा गाडीत टाकले. आम्ही कचरा वगळता रूग्णांना वापरलेले इंजेक्‍शन अथवा रूग्णालयाच्या अन्य कोणत्याही वस्तू घंटागाडीत टाकत नाही.

– डॉ. महेश कुदळे, संचालक, जीवनरेखा रुग्णालय.

Leave A Reply

Your email address will not be published.