2019चे दशक आहे सर्वाधिक उष्णतेचे

माद्रिद (स्पेन) – जागतिक तापमानवाढीच्या संदर्भात सध्याचे चालू दशक हे सर्वाधिक उष्णतेचे होते, अशी माहिती पुढे आली आहे. तापमानवाढी संदर्भातील नियोजित उपाय योजनांच्या वार्षिक आढाव्यादरम्यान ही माहिती देण्यात आली.

यावर्षी आतापर्यंतचे जागतिक तापमान पूर्व-औद्योगिक सरासरीपेक्षा 1.1 डिग्री सेल्सियस (2 अंश फॅरेनहाईट) इतके अधिक होते, असे जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे.

जीवाश्‍म इंधनाचा वापर, पायाभूत सुविधांची उभारणी, वाढणारी पिके आणि वस्तूंच्या वाहतुकीतून होणारे मानवनिर्मित उत्सर्जन 2019 मध्ये वातावरणातील कार्बनच्या थरांचा विक्रम मोडीत काढण्याच्या बेतात आहे. हरितगृहांमधील उत्पादित झालेल्या उष्णतेपैकी 90 टक्के अतिरिक्‍त उष्णता समूद्र शोषून घेतात. या सागराचे तापमान आता त्यांचे सर्वोच्च पातळीवर नोंदले गेले आहे. हा देखील भविष्यासाठीचा एक इशाराच आहे, असेही जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे.

जगातील समुद्र आता 150 वर्षांपूर्वीच्या तुलनेत एक चतुर्थांश अधिक अम्लीय आहेत, त्यामुळे अब्जावधी लोक अन्न व रोजगारावर अवलंबून असलेली महत्त्वाची सागरी परिसंस्थाच धोक्‍यात आली आहे. ऑक्‍टोबरमध्ये, ग्रीनलॅंडच्या बर्फाच्या स्तरातून 12 महिन्यांत गमावलेल्या 329 अब्ज टन बर्फामुळे ऑगस्टमध्ये जागतिक पातळीवरील समुद्राची पातळी सर्वाधिक वाढली होती. गेली चार दशके क्रमाक्रमाने अधिकाधिक उष्ण ठरली होती.

2019 च्या पहिल्या पूर्वार्धात 10 दशलक्षाहून अधिक लोकांचे अंतर्गत विस्थापन झाले तर वादळ, पूर आणि दुष्काळ यासारख्या घटनांमुळे सात दशलक्ष लोकांचे थेट विस्थापन झाले आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत तीव्र वातावरणामुळे विस्थापित होणाऱ्यांची संख्या 22 दशलक्ष इतकी होईल, असा अंदाजही “डब्लूएमओ’ने वर्तवला आहे.

आशा आणि आत्मसमर्पण यापैकी एकाची निवड करावी लागेल – गुटेरस
मानवी संस्कृतीला आव्हान देणाऱ्या हवामान बदलाच्या संकटाचा सामना करत असलेल्या मानवतेला आशा आणि आत्मसमर्पण यापैकी एकाची निवड करावी लागेल असं संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी म्हटले आहे. ते काल माद्रिद इथं संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील परिषदेच्या उद्घटनपर भाषणात बोलत होते. एक मार्ग आत्मसमर्पणचा आहे ज्यात या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य आणि सुरक्षा धोक्‍यात असून परतीचा मार्ग बंद झाला आहे असे ते म्हणाले. पॅरिस करारातून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली असली तरी हवामान बदलाविरोधातल्या संघर्षात अमेरिका अजूनही जगातल्या अन्य देशांबरोबर आहे. अमेरिकेचा मोठा वर्ग अजूनही 2015 च्या करारांतर्गत निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अमेरिकी कॉंग्रेसचे नेते नॅन्सी पेलोसी या परिषदेला उपस्थित आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.