भिवंडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 20 वर

ठाणे – भिवंडीत इमारत कोसळून काल जी दुर्घटना झाली त्यातील मृतांची संख्या आता 20 झाली आहे. काल रात्री त्या इमारतीचा ढिगारा उपसताना आणखी 7 जणांचे मृतदेह तेथे आढळून आले.

एकूण जे 20 जण मरण पावले आहेत त्यात आठ लहान मुले आहेत. या दुर्घटनेतून 23 जणांना वाचवण्यात यश आले आहे. कोसळलेली जिलानी नावाची ही इमारत 43 वर्षे जुनी आहे. 

या दुर्घटना प्रकरणात दोन महापालिका कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच इमारत मालकावरही निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इमारतीत एकूण 40 फ्लॅट्‌स होते आणि त्यात एकूण 150 जण राहात होते. 

रात्री इमारतीतील रहिवासी झोपलेले असतानाच हा प्रकार घडला आहे. एनडीआरएफची पथके बोलावून ढिगारा उपसण्याचे काम केले गेले आहे. ठाण्याच्या आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक अजूनही या ढिगाऱ्याच्या ठिकाणी काम करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.