कोरोना बळींची संख्या 490 वर

चीनमध्ये साथ आटोक्‍यात आणण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न

बिजिंग : कोरोना विषाणूंमुळे मरण पावलेल्यांची संख्या बुधवारी 490 वर पोहोचली. एकून बाधीतांची संख्या 24 हजार 324वर पोहोचली आहे. चीनच्या 31 प्रांतात या विषाणूंचे बाधीत आढळून आले आहेत.

हुबेई प्रांत आणि वुहानमध्ये मंगळवारी 65 जण मरण पावले. तर तीन हजार 887 नवे बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी अत्यंत चिंताजनक प्रकृती असणारे 431 रुग्ण होते. तर तीन हजार 219 जणांची प्रकृती चिंताजनक होती. याशिवाय आणखी 23 हजार 260 जणांना बाधा झाल्याचा संशय आहे. त्यांच्या चाचाणीचे निर्णय प्रतिक्षेत आहेत. तर कोरोनापासून बरे झालेल्या एकूण 892 जणांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

चीनमध्ये रुग्णांच्या निकटच्या सानिध्यात आलेल्या दोन लाख 52 हजार लोकांची ओळख पटवण्यात आली आहे. तर त्यापैकी एक लाख 85 हजार जणांना वैद्यकीय देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे.
हॉंगकॉंगमध्ये मंगळवार अखेर बाधा झालेल्यांची संख्या 18वर पोहोचली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान तैवानमध्ये 11 तर मकाओ सर येथे 10 रुग्ण सापडले.

चीनमध्ये साथ आटोक्‍यात आणण्यासाठी चीन सरकारने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. सोमवारी एक हजार खाटांचे नव्याने उघडलेले रुग्णालय सुरू करण्यात आले. गुरूवारी आणखी 1300 खाटांचे आणखी एक रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी आठ फिरते दवाखाने सुरू करण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.