कामशेत – पवन मावळातील राऊतवाडी (करुंज) येथे खेळत असताना पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. 10) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. अक्षदा लहानू वाघमारे (वय 9) हिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिचे वडील लहानू भीमा वाघमारे (वय 27, रा. राऊतवाडी, ता. मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊतवाडी येथे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास खेळता खेळता अक्षदा पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडली. काही वेळानंतर लक्ष्मण वाघमारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिला उपचारासाठी पवनानगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषीत केले.