अंगापूरच्या जवानाचा पूँछमध्ये मृत्यू

नागठाणे – सातारा तालुक्‍यातील अंगापूरचे सुपुत्र व हवालदार विजय अंकुश कणसे वय 32 यांचा पूँछ येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. गेली चौदा वर्ष ते सैन्यदलात कार्यरत आहेत. रविवार, दि. 14 रोजी रात्री 10वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचा संदेश सातारा जिल्हा सैनिक कार्यालयात आला. त्यानंतर कार्यालयाच्या वतीने त्यांच्या निकटवर्तीयांना सांगण्यात आले. ही बातमी कळताच कुटुंबासह गावावर शोककळा पसरली.

जवान विजय कणसे हे 2005मध्ये सैन्यदलात दाखल झाले होते. गेली चौदा वर्ष ते 40 राष्ट्रीय रायफल (आर.आर) आर्मीमेडिकल कोर (ए.एम.सी) कार्यरत होते. त्यांनी लखनऊ येथील प्रशिक्षण केंद्रात घेवून नाशिक, अखनूर (जम्मू काश्‍मीर) व सध्या पूँछ येथे कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी सोनम, मुलगी ईश्‍यू असा परिवार आहे. गावी एकत्रीत कुटुंबात दोन सेवानिवृत्त सैनिक तर दोन जवान कार्यरत आहेत. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयावर तसेच अंगापूर परीसरात शोककळा पसरली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.