फाशीचे अनुकरण करताना मुलाचा मृत्यू

मंदसौर : मोबाईलवर व्हिडिओ पाहून भगतसिंगांच्या फाशीच्या दृष्याचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नात येथे एका बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यू होण्याची दुर्देवी घटना घडली. मदनासौरमधील अफझलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. त्याने घरात गळफास घेतला.

त्याचे नाव श्रेयंश असे आहे. तो अवघ्या 12 वर्षाचा आहे. ही घटना घडली, त्यावेळी तो मोबाईलवर भगतसिंग यांच्या जीवनावरील व्हिडिओ पहात होता, असे पोलिसांनी सांगितले. भगतसिंग यांच्या जीवनावरील शाळेत सादर केलेली नाटीका तो व्हिडिओवर पहात होता. त्यावेळी भगतसिंग यांच्या फाशीच्या दृष्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न त्याने केला.

मात्र तो तोल सावरू शकला नाही. त्यामुळे गळफास बसला, त्यात त्याचा मृत्यतू झाला, असे मंदसौरचे पोलिस अधिक्षक हितेश चौधरी यांनी सांगितले. या घटनेची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या नाटिकेत तो पोलिस अधिकाऱ्याची भूमिका करत होता.

मुलाच्या शवविच्छेदन अहवालात गळफास बसल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुले मोबाईलवर जे पाहतात, त्याचे अनुकरण लागलीच करण्याचा प्रयत्न करताता, त्यामुळे पालकांनी त्यांचे संगोपन करताना काळजी घ्यावी,असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.