पुणे, दि. 3 -पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाचे “कट-ऑफ’ जाहीर करण्यात आले आहेत. यात मागील वर्षाच्या तुलनेत नामांकित महाविद्यालयांचा “कट-ऑफ’ घसरला आहे. विज्ञान शाखेपेक्षाही कला शाखेच्या “कट-ऑफ’मध्ये वाढ झाली आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी पहिली नियमित फेरी राबविण्यास सुरुवात केली आहे. नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याकडेच विद्यार्थ्यांचा ओढा असतो. या फेरीचे “कट-ऑफ’ पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गतवर्षापेक्षा यंदाच्या वर्षी “कट-ऑफ’मध्ये थोडाफारच बदल झाला आहे.
नामांकित महाविद्यालयांचा शाखानिहाय “कट-ऑफ’ (टक्क्यांत)
पबृह्न्महाराष्ट्र : वाणिज्य- 95 पफर्ग्युसन : कला – 96.40, विज्ञान – 88 पसर परशुरामभाऊ : कला – 93.40, वाणिज्य- 88.8, विज्ञान- 92.20 पनौरोसजी वाडिया : कला- 88.20, विज्ञान- 87.80 पनेस वाडिया : वाणिज्य – 83.40 टक्के पसिंबायोसिस : कला -93.20, वाणिज्य -91 पडॉ. कलमाडी श्यामराव : कला- 91.60, वाणिज्य-85.20,विज्ञान -91.20 पमॉडर्न महाविद्यालय : कला – 64.40, वाणिज्य-86.20, विज्ञान-91.60 पआबासाहेब गरवारे : कला-63.80, विज्ञान-90.40