नवी दिल्ली – अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह 13 देशांमधील नेत्यांच्या तुलनेत भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात जास्त लोकप्रिय ठरले आहेत. अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केले आहे. जवळपास जगभरातील 13 नेत्यांना मागे टाकत मोदींनी ही लोकप्रियता मिळविलेली आहे.
अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणात मोदींना 70 टक्के गुणांकन मिळालंय. दर आठवड्याला या सर्वेक्षणाचा डेटा अपडेट केला जातो. यामध्येप्रौढांमध्ये मोदींची लोकप्रियता कमी असल्याचे आढळून आले आहे.
Global Leader Approval: Among All Adults https://t.co/dQsNxouZWb
Modi: 70%
López Obrador: 64%
Draghi: 63%
Merkel: 52%
Biden: 48%
Morrison: 48%
Trudeau: 45%
Johnson: 41%
Bolsonaro: 39%
Moon: 38%
Sánchez: 35%
Macron: 34%
Suga: 25%*Updated 9/2/21 pic.twitter.com/oMhOH3GLqY
— Morning Consult (@MorningConsult) September 4, 2021
सर्वेक्षणाच्या निकषानुसार भारतात प्रौढांपैकी 25 टक्के लोकांनी मोदींना नाकारले आहे.
मॉर्निंग कन्सल्टच्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदी गेल्या आठवड्यात सर्वेक्षण केलेल्या तेरा जागतिक नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर होते.
यावर्षीच्या जून महिन्यात त्यांचे गुणांकन 66 टक्क्यांवर घसरले होते. दरम्यान, ऑगस्ट 2019 मध्ये मोदींचे गुणांकन तब्बल 82 टक्क्यांवर होते.पंतप्रधान मोदी मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी, जर्मन चान्सलर अँजेला मर्केल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या पुढे आहेत.