नगर – जिल्ह्यात आज 145 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 61 हजार 389 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.08 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्णसंख्येत 219 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1564 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 23, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 92 आणि अँटीजेन चाचणीत 104 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 11, कर्जत 1, नगर ग्रामीण 4, नेवासा 1, पारनेर 4, श्रीगोंदा 1, मिलिटरी हॉस्पिटल 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 23, अकोले 3, कर्जत 2, कोपरगाव 16, नेवासा 3, पारनेर 5, पाथर्डी 3, राहाता 10, राहुरी 5, संगमनेर 13, शेवगाव 2, श्रीरामपूर 6, कॅंटोन्मेंट 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 104 जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा 3, अकोले 6, जामखेड 4, कर्जत 5, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 4, नेवासा 13, पारनेर 4, पाथर्डी 11, राहाता 4, राहुरी 11, संगमनेर 18, शेवगाव 8, श्रीगोंदा 6, श्रीरामपूर 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 7, अकोले 12, जामखेड 2, कर्जत 14, कोपरगाव 5, पारनेर 18, पाथर्डी 16, राहाता 13, राहुरी 4, संगमनेर 10, शेवगाव 14, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 21 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.