नगर – करोना विषाणूची धावसंख्या आजही कायम असल्याचे चित्र आहे. नगर जिल्ह्यात नव्याने 1 हजार 652 जणांना करोना विषाणूने घेरल आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय बुलेटीमधून ही आकडेवारी आज जाहीर करण्यात आली.
दरम्यान, आज जिल्ह्यात 1 हजार 680 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 95 हजार 175 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 88.81 टक्क्यांपर्यत घसरले आहे. आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1हजार 652 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 10 हजार 738 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 458, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 492 आणि अँटीजेन चाचणीत 702 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 141, अकोले 13, जामखेड 16, कर्जत 11, कोपरगाव 35, नगर ग्रामीण 22, नेवासा 03, पारनेर 07, पाथर्डी 24, राहता 27, राहुरी 11, संगमनेर 53, शेवगाव 32, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 09, कँटोन्मेंट बोर्ड 44, मिलिटरी हॉस्पिटल 05 आणि इतर जिल्हा 04 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 155, अकोले 06, जामखेड 01, कर्जत 04, कोपरगाव 56, नगर ग्रामीण 35, नेवासा 04, पारनेर 06, पाथर्डी 01, राहाता 88, राहुरी 20, संगमनेर 31, शेवगाव 04, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 57, कँटोन्मेंट बोर्ड 03, इतर जिल्हा 15 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 702 जण बाधित आढळून आले. मनपा 66, अकोले 49, जामखेड 29, कर्जत 151, कोपरगाव 08, नगर ग्रामीण 77, नेवासा 58, पारनेर 15, पाथर्डी 63, राहाता 31, राहुरी 66, शेवगाव 48, श्रीगोंदा 05, श्रीरामपूर 04, कॅन्टोन्मेंट बोर्ड 15 आणि इतर जिल्हा 17 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 433, अकोले 61, जामखेड 37, कर्जत 101, कोपरगाव 114, नगर ग्रामीण 74, नेवासा 55, पारनेर 60, पाथर्डी 63, राहाता 229, राहुरी 92, संगमनेर 105, शेवगाव 61, श्रीगोंदा 37, श्रीरामपूर 116, कॅन्टोन्मेंट 16, मिलिटरी हॉस्पिटल 14 आणि इतर जिल्हा 12 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:95175
उपचार सुरू असलेले रूग्ण:10738
जिल्ह्यातील एकूण मृत्यू:1255
एकूण रूग्ण संख्या:1,07,168