कवठे येथे साडेतीन हजार वृक्षांची लागवड

कवठे – शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत पर्यावरणाच्या रक्षणासाठी व डोंगर जमिनीची धूप थांबविण्यासाठी कवठे ग्रामस्थ व किसनवीर महाविद्यालय, वाईच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने कवठे येथील डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी 3500 विविध जातींच्या रोपांची लागवड केली.

कवठे गावाला दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे गावातील ग्रामस्थ, महिला व युवकांनी यंदा उन्हाळ्यात जवळपास दोन महिने श्रमदान केले होते. यामध्ये पावसाचे पाणी अडविण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर चर खोदले होते.
यंदा पावसाने समाधाकारक हजेरी लावल्याने युवकांनी या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी किसनवीर महाविद्यालय वाईच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रामस्थ व युवकांनी काल कवठे येथे श्रमदान करुन विविध जातीची जवळपास 3500 वृक्षांचे रोपण केले. या मोहिमेसाठी त्यांना कवठे ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरण विभागाने सर्वोतोपरी मदत केली.

यावेळी सरपंच श्रीकांत वीर, उपसरपंच संदिप डेरे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. आनंद घोरपडे, प्रा. डॉ. बी. बी. आगेडकर, प्रा. डॉ. राजेश गावीत, प्रमोद डेरे, पुरुषोत्तम डेरे, सचिन पोळ, विजय पोळ, दिलीप चव्हाण, राहुल डेरे, संदीप पोळ, गोरख चव्हाण, माधवराव डेरे, सचिन जगताप, रोहन जाधव, संतोष घाडगे, राजेश डेरे, केतन ननावरे, अविष्कार जगताप, शिवाजी पोळ, केतन पोळ, वैभव डेरे, तुषार पोळ, बी. ई. पोळ, संतोष डेरे, जितेंद्र राऊत, विक्रम डेरे, ग्रामविकास अधिकारी तांबे, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.