ढगाई देवी मंदिरात आषाढी यात्रे निमित्त भाविकांची गर्दी

होळ (बारामती)- ढगाई देवी मंदिरात आषाढी यात्रे निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. बारामती तालुक्यातील नीरा नदी काठी होळमध्ये ढगाई देवी मंदिर आहे. मंदिराचे सुशोभीकरण ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व शासनाच्या माध्यमातून झाले आहे. निसर्गरम्य परिसर असल्याने या भागात भाविकांची वर्दळ असते पोर्णिमेनंतर आषाढ महिन्यात शुक्रवार (दि.१९) पासून यात्रेला सुरुवात झाली.

ढगाई देवी मंदिरात आषाढी यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी

ढगाई देवी मंदिरात आषाढी यात्रेनिमित्त भाविकांची गर्दीहोळ (बारामती)- ढगाई देवी मंदिरात आषाढी यात्रे निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. बारामती तालुक्यातील नीरा नदी काठी होळमध्ये ढगाई देवी मंदिर आहे. मंदिराचे सुशोभीकरण ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व शासनाच्या माध्यमातून झाले आहे. निसर्गरम्य परिसर असल्याने या भागात भाविकांची वर्दळ असते पोर्णिमेनंतर आषाढ महिन्यात शुक्रवार (दि.१९) पासून यात्रेला सुरुवात झाली.

Posted by Digital Prabhat on Friday, 19 July 2019

मंदिरात आषाढी यात्रे निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जलदेवता म्हणुन परिसरात ढगाई देवीचे महत्व आहे त्यामुळे आषाढात येथे यात्रा भरते त्यामुळे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येथे भाविक येत असतात. आषाढी पौर्णिमेनंतर आजूबाजूला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्ष लागवड केली असून, निसर्गरम्य परिसर झाला आहे. नवसाला पावणारी देवी असा महात्म्य असल्याने या भागात भाविकांची सतत वर्दळ असते. याठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी परिसर स्वच्छ करून पाण्याचे व्यवस्थापन ग्रामस्थांनी केली आहे. यात्रा कालावधीत आरती अभिषेक नैवेद्य मोठ्या भक्तिभावाने देवीला अर्पण करतात. त्यासाठी विश्वस्त समितीच्या वतीने दर्शन रांग तयार करण्यात आली आहे.

१४ दिवस हा यात्रा उत्सव राहणार असून अमावस्या दिवशी यात्रेची सांगता होते. यावेळी ढोल ताशाच्या गजरात नगर प्रदक्षिणा घालून देवीची मुखवट्यांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. यावेळीही होळ सस्तेवाडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात गावातील लक्ष्मीआई मंदिरात पूजा करून यात्रेची सांगता होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)