देऊळगावराजे -सिध्दटेक (ता. कर्जत) येथे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने पहाटे चार वाजल्यापासून भाविकांची रिघ लागली होती. आज रविवार असल्यामुळे सिध्दटेकला दौंड, कर्जत, श्रीगोंदा अशा तीन तालुक्यांतून भाविक दर्शनासाठी आले होते. सकाळी थंडी अल्यामुळे गर्दी थोडी कमी होती; पण नंतर गर्दीत वाढ झाली.
यावेळी नित्यनियमाप्रमाणे श्रींच्या मूर्तीला पहाटे स्नान घालून अभिषेक करण्यात आला आणि मंदिराचे प्रवेशद्वार दर्शनासाठी भाविकांना खुले करण्यात आले. दुपारी 12 वाजता श्रींना नैवद्य दाखवण्यात आला, त्यानंतर चिंचवड देवस्थानकडून आलेल्या भाविकांना खिचडीचा प्रसाद देण्यात आला, अशी माहिती पिंपरी-चिंचवड देवस्थानकडून देण्यात आली.