पिंपरी – मटणाच्या दुकानावर गर्दी केल्या प्रकरणी मटण विक्रेत्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 25) दुपारी दोनच्या सुमारास थेरगाव
येथे घडली.
अब्दुल हमीद कुरेशी (वय 49), नूर गुलजार खान (वय 21), जावेद हाजी शेख (वय 32), मोहंमद शमीम शेख (वय 40), सलीम अन्सारी (वय 36), आझम कुरेशी (वय 30), अजीज शेख (30, सर्व रा. थेरगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार एस. एस. कापरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील एका मटणाच्या दुकानावर नागरिकांनी गर्दी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेत मटण विक्रेत्यासह सात जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर भारतीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. तपास सपोनि सपना देवताळे करीत आहेत.