#व्हिडीओ : हल्ल्याच्या तयारीत असलेल्या मगरीला धाडसी तरुणांनी केले जेरबंद

कोल्हापूर – जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथं गोठ्यात शिरून हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या मगरीला धाडसी तरुणांनी पकडून आपल्या जिविता बरोबर जनावरांच्याही जीविताचे रक्षण केल आहे. घराजवळच असणाऱ्या नदीतील पाणी कमी झाल्यामुळे मगरींनी आपला मोर्चा जवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्यांच्या कडे वळवला आहे. मगरी पासून मनुष्याबरोबर प्राण्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात सैनिक टाकळी इथं जनावरांच्या साठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करण्याकरता संदीप आणि सचिन हे दोघे भाऊ शेतात कडे निघाले होते. जाता जाता गोठ्या जवळच 10फुट लाबीची मगर येऊन म्हशी गाईंच्या वर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ शेजारी राहणाऱ्या सर्व नातेवाईकांना बोलावून दोरखंडाच्या साह्याने मगरीला जेरबंद केले. टाकळी गावाजवळ नदी पासून जवळच असणाऱ्या वस्तीवर आज आपला मोर्चा मगरीने वळवला होता पण धाडसी आणि चाणाक्ष नजरेच्या तरुणांमुळे गोठ्यात जनावरांचा वर होणारा मगरीचा हल्ला थांबवता आला त्यामुळे जीवितहानी टळली.

वर्षभरामध्ये मगर पकडण्याची ही दुसरी घटना असून या मगरींच्या पासून शिरोळ नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे अंदाजे वीस कुटुंब राहण्यासाठी असलेल्या या वस्तीतील नागरिकांनी धास्तीच घेतली आहे वन विभागाने तात्काळ या गोष्टीची दखल घेऊन नागरिकांना होणारा मगरीचा त्रास थांबवावा अन्यथा आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा देण्यात आला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.