पुणे- खुनाचा प्रयत्नाचे गुन्हयात सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झालेला व पुणे शहर व जिल्हयामधुन दोन वर्षाकरीता तडीपार केलेला गुन्हेगारास युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. तो पत्नीला भेटायला आला असताना त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.
वसिम फक्रुददीन शेख (33) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार 11/3/2009 रोजी लोहीयानगर येथील व्यंकटेश सुपर मार्केट समोर फिर्यादी नंदलाल विठठल नाईक (45) यांचे रिक्षाची काच फोडली म्हणुन त्यांनी वसिम फक्रुददीन शेख यास शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात ठेवुन त्याने त्याचेजवळील तलवारीने फिर्यादी यांचे डोक्यावर, कपाळावर व हातावर वार करुन त्यांना गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता .
न्यायालयाने त्यास सात वर्ष सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा सुनावलेली आहे. आरोपीने त्याविरुध्द उच्चन्यायालयात शिक्षेविरुध्द अपील केले असुन तो जामिनावर सुटलेला आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेच्या दुष्टीने पोलीस उपायुक्तांनी य वसिम शेख यास 2 वर्ष कालावधी करीता तडीपार केले आहे. दरम्यान युनिट -1 गुन्हे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गुन्हेगार चेकींग करत होते. तेव्हा पोलीस अंमलदार अमोल पवार यांना खबर मिळाली तडीपार असलेला वसिम शेख हा त्याचे पत्नीस भेटण्यासाठी लेकटाऊन कात्रज येथील घरी येणार आहे. त्यानूसार त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
त्याला भारती विदयापीठ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. त्याचेविरुध्द खडक व कोंढवा पोलीस स्टेशन पुणे याठिकाणी जबरी चोरी , खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, घातक शस्त्र जवळ बाळगणे, तडीपार आदेशाचा भंग करणे यासारखे एकुण आठ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे,
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त(गुन्हे) श्रीनिवास घाडगे पोलीस उप-आयुक्त, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार , इम्रान शेख , तुषार माळवदकर , सतीश भालेकर , महेश बामगुडे यांनी केली आहे.