कराड -जमीर मलिक शेख (फकीर) (वय 30, रा. कराड) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दोघांनी बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कराड बसस्थानक परिसरात लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सातारा येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे.
कराड बसस्थानक परिसरातील एका दारूच्या दुकानाजवळ जमीर शेखवर दोघांनी अचानक हल्ला केला. त्यांनी जमीरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात जमीरच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.