सत्यशील शेरकरांच्या नेतृत्वावर सभासदांची विश्‍वासार्हतेची मोहोर

शिरोली बुद्रुक येथील कृषक संस्था, श्री निवृत्तीशेठ पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

निवृत्तीनगर -सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्व सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वाखाली 10 गावांची मिळून असलेली शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित आणि श्री निवृत्तीशेठ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित या दोन्ही संस्थाच्या पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. या निवडणुकांमुळे सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य सभासदांचा विश्‍वास कायम असल्याचे दिसून आले.

जुन्नर तालुक्‍यातील शिरोली बुद्रुक येथील कृषक संस्था व श्री निवृत्तीशेठ ग्रामीण पतसंस्थेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या दोन्हीही संस्थाच्या संचालक पदाकरिता अर्ज भरण्याचा शनिवार (दि.1) शेवटचा दिवस होता. शिरोली कृषक संस्थेच्या 19 संचालकांच्या जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, या जागेंसाठी 19 अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

बिनविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे- सत्यशील सोपानशेठ शेरकर, रामदास बबन नवले, प्रदीप लक्ष्मण थोरवे, ज्ञानेश्‍वर नाथा थोरवे, मार्तंड सीताराम मांडे, आनंद जनाजी औटी, दिलीप मार्तंड कवडे, प्रभाकर भिकाजी पारवे, शिवाजी हरिभाऊ डोके, अनिल गणपत मांडे, मंगेश अनंत शेळके, संदीप श्रीहरी शिंदे, विश्‍वास खंडू वायकर, चंद्रकांत महादू ढोमसे, नितीन लक्ष्मण पंडित, कमल गोरक्षनाथ उकिर्डे, संगीता निवृत्ती नायकोडी, नैनेश रामदास विधाटे, राजाराम देवराम चव्हाण.

श्री निवृत्तीशेठ ग्रामीण पतसंस्थेच्या 13 जागेंसाठी अर्ज भरण्याचा शनिवार (दि. 1) शेवटचा दिवस होता. 13 जागेंसाठी 13 अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.

बिनविरोध संचालक पुढीलप्रमाणे- सत्यशील सोपानशेठ शेरकर, गणेश हरीचंद्र राऊत, बशीर कादर इनामदार, संजय किसन थोरवे, अजय हिरामण शेरकर, सुहास दशरथ बोऱ्हाडे, सचिन रामचंद्र थोरवे, लक्ष्मण रामचंद्र आल्हाट, विजया शंकर लोहोकरे, सुनीता पंढरीनाथ विधाटे, संतोष रामचंद्र भुजबळ, दिगंबर अण्णा मका.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.