गाय उच्छवासातून ऑक्‍सिजनच सोडते

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने वादंग

डेहराडून – गाय हा असा एकमेव प्राणी आहे की जो श्‍वासाद्वारे ऑक्‍सिजन घेतो आणि उच्छवासाद्वारेही ऑक्‍सिजनच सोडतो. त्यामुळे गायीच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्तीचा टीबी बरा होंऊ शकतो असे विधान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केले आहे. त्यांच्या या विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. रावत यांनी एकेठिकाणी बोलताना हे विधान केले. त्याचा व्हीडीओ सध्या व्हायरल झाल्याने त्यावर खूपच टिका टिपण्णी होऊ लागली आहे.

गायीचा मसाज केल्याने लोकांच्या श्‍वसनाचे विकार कमी होऊ शकतात असेही विधानही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे. त्याखेरीज गायीचे मूत्र आणि दूध याच्या वैद्यकीय उपयोगाचे महत्वही त्यांनी यात विषद केले आहे. याच राज्यातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार अजय भट्ट यांनी अलिकडेच गर्भवती महिलांनी बागेश्‍वर जिल्ह्यातील गरूड गंगा नदीचे पाणी पिले तर त्या महिलेचे सीझरींग टळते असे विधान करून वाद ओढवून घेतला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.