‘टिक टॉक’ बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश… (भाग-२)

‘टिक टॉक’ बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश… (भाग-१)

याचिकाकर्त्याच्या वतीने “बाईट डान्स” या चिनी कंपनीने सप्टेंबरमधे हे अॅप सुरु करणेत आले, तेव्हापासून हे अॅप देश विदेशात पाचशे दशलक्ष पेक्षा जास्त लोक वापरु लागले. फक्‍त भारतात हे अॅप 104 दशलक्ष लोक वापरत आहेत. बहुतांश तरुणाई व लहान मुले त्याच्या अधीन गेली आहेत. तरुण व मुले यावर सहजपणे व्हिडीओ बनवीत असुन उत्तेजनात्मक व्हिडिओ अनोळखी लोकांबरोबर शेअर करीत आहेत. गमतीशीर व्हिडीओंबरोबर मादक व्हिडीओच्या अधीन तरुणाई वाहवत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. “रशिया”मधे तयार झालेल्या ब्ल्यु व्हेल या गेममुळे या अगोदर अनेकांनी आत्महत्या केल्या. त्यानंतर न्यायालयाने स्वत:हुन त्याबाबत याचीका दाखल करीत या गेमवर बंदी आणली. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी व शासन यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. त्रयस्थ व्यक्तीशी थेट संपर्कात आणून तरुणाई अश्‍लिल अवयवाचे प्रदर्शन करीत प्रलोभन दाखवण्यासारखे भयानक प्रकार करीत आहे. यामुळे तरुणाई परंपरा व संस्कृती विसरत चालली आहे. चेन्नईमधे एका महिलेचा व्हिडिओ टिक टॉक वर टाकल्याबद्दल एका रिक्षा चालकाला अटक झाली. यावरुन या अॅपचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. त्यामधे प्रतिवादीनी टिक टॉक डाउनलोड करण्यापासून बंदी घालणेत यावी. माध्यमांनी टिकटॉकवरील व्हिडीओ प्रसारण त्वरीत बंद करावे.

केंद्र सरकार अमेरिकेप्रमाणे भारतात मुलांचे ऑनलाईन स्वातंत्र्य सुरक्षितता कायदा (गुप्तता राखण्याचे स्वातंत्र्य), (ऑनलाईन प्रायव्हेसी प्रोटेक्‍शन ऍक्‍ट) तयार करणेसाठी प्रयत्न करणार आहे का याबाबत त्वरित उत्तर द्यावे असेही आदेश देण्यात आले आहेत.

अमेरिकेसारख्या प्रगत देशात मुलांच्या भवितव्याचा विचार करुन माहीती तंत्रज्ञानातुन मुलांच्या गोपनीय बाबींचे संरक्षणाचा कायदा आणत असेल तर भारतालाही ते अवघड नक्कीच नाही.

…अॅप डाउनलोड करुन आधुनिक दरोडे.
सध्या क्राईम पेट्रोलमधील एक व्हिडीओ क्‍लिप व्हॉटस अॅपवर फिरत आहे. त्यात पोलीस चोराला विचारतात तू ऑनलाईन चोऱ्या कशा करतो तर तो उत्तर देतो मी “अश्‍लील वेबसाईट”चे अॅप तयार करतो. त्यात ते डाउनलोड करताना काही माहिती विचारतो लोक विशेषतः तरुणाई हे अॅप डाउनलोड करताना जी माहीती सादर करतात, त्यानुसार व्हायरसद्वारे संपूर्ण मोबाईलचा डाटा चोरी करून ऑनलाईन व्यवहाराद्वारे कोट्यावधी रुपये चोरतो. यावरून कोणतेही अॅप सहज डाउनलोड केले तर मोठे नुकसान होऊ शकते हा धोका देखील समजणे गरजेचे आहे हे स्पष्ट होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.