-->

देशातील वित्तीय तूट चिंताजनक पातळीवर

साडे सात टक्‍क्‍यांवर गेले प्रमाण

नवी दिल्ली – देशातील वित्तीय तुटीचे प्रमाण चिंताजनक पातळीवर गेले असून आता हे प्रमाण तब्बल साडे सात टक्‍क्‍यांवर गेले आहे. मागच्यावर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात देशाच्या वित्तीय तुटीचे प्रमाण साडे तीन टक्के इतके राहील असे भाकित वर्तवण्यात आले होते, पण प्रत्यक्षात ते जवळपास शंभर टक्‍क्‍यांनी वाढलेले दिसत आहे.

ही तूट सुमारे साडे चौदा लाख कोटी रूपयांची आहे.तसेच सरकारी कर्जाचे प्रमाणही 50 टक्‍क्‍यांहून अधिक वाढले असून ते सुमारे बारा लाख कोटी रूपयांवर गेले आहे.

गेल्यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना जे आकडे अपेक्षित धरले होते त्यापेक्षाही आर्थिक गणित बरेच बिघडल्याचे सध्याच्या स्थितीवरून पहायला मिळत आहे.

सन 20-21 या वर्षात देशाचे एकूण राष्ट्रीय उत्त्पन्न चालू दरांनुसार 194.82 लाख कोटी रूपये इतके झाले आहे. ते 203.40 लाख कोटी इतके अपेक्षित धरण्यात आले होते. सन 20-21 या काळातील जीडीपीचा दर उणे 4.2 टक्के इतका राहील असा अंदाज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.