नवी दिल्ली – देशाचा करोना रुग्ण बरे होण्याचा दर 92.41 इतका झाल्याची माहिती सरकारतर्फे आज सकाळी जारी करण्यात आलेल्या अपडेटमध्ये देण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत देशात करोनाचे 50 हजार 356 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आज लागोपाठ नवव्या दिवशी करोनाच्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 6 लाखांच्या आतच राहिली आहे. सध्या देशात करोनाचे एकूण 5 लाख 16 हजार 632 सक्रिय बाधित उपचार घेत आहेत.
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात आत्तापर्यंत करोनाच्या एकूण 11 कोटी 65 लाख 42 हजार 304 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शुक्रवारी देशभरात एकूण 11 लाख 13 हजार 209 करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.