मुंबई: यावर्षी विधानसभा निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदा ठाकरे घराण्याने उमेदवार दिला असून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरेंना अभिनेता संजय दत्तने शुभेच्छा दिल्या. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांसोबत संजय दत्त चे असलेले संबंध उभ्या महाराष्ट्राला माहित आहेत.
आदित्य ठाकरे माझ्या लहान भावासारखा आहे. तो मोठया मताधिक्क्याने निवडून येईल. तसेस देशाला आदित्य सारख्या युवानेतृत्त्वाची गरज असल्याचे संजय दत्त म्हणाला. दरम्यान, त्याने बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना देखील उजाळा दिला. बाळासाहेब माझ्या वडिलांसारखे होते. त्यांनी मला व माझ्या कुटुंबाला केलेली मदत मी कधीही विसरू शकत नाही, असे तो म्हणाला.