देशाला ‘संभाजी भिडे’ यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज

सांगली – सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादंगाला सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीमध्ये दुर्गामाता दौड आयोजित कार्यक्रमादरम्यान करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंग सेंगर यांनी संभाजी भिडे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

सेंगर म्हणाले की,’देशाला संभाजी भिडे यांच्यासारख्या पंतप्रधानाची गरज आहे. असे झाले तरच देश वाचेल, सध्या आपल्या देशामध्ये हिंदूंचे हाल सुरू आहेत. यातून देशाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक श्री संभाजीराव भिडे गुरुजी वाचवू शकतात. तेच खरे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहेत.’ त्यांच्या या विधानामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्या वादंगाला सुरुवात झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.