मोदी यांच्या हाती देश सुरक्षित नाही – शरद पवार

परभणी – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्था, नोटबंदी, जीएसटी आणि राफेल च्या मुद्यावरून सरकारला घेरत शरद पवार यांनी जोरदार निशाणा साधला. राफेलच्या मुद्द्याचा उल्लेख करत देशाची गुप्त माहिती सुरक्षित ठेवता येत नाहीत, ते देश काय सुरक्षित ठेवणार असा प्रश्न उपस्थित केला. राफेलची कागदपत्रे चोरीला गेली होती असे सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितले होते. याच मुद्द्याचा वापर करत शरद पवारांनी ही टीका केली आहे. परभणीतील प्रचार सभेत ते बोलत होते.

देशात विमान निर्मितीच्या सरकारी कारखाने असताना खासगी विमान कंपनीला का काम देण्यात आले? असा सवाल यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. ज्यांना कागदाचे विमान बनवण्याचा देखील अनुभव नाही अशा लोकांना राफेल विमान बनवण्याचे काम देण्यात आली आहेत. याची चौकशी करायला हवी असे ते म्हणाले.

देशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत बोलताना मागील ५ वर्षात मोदी सरकारने सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे  केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. मोदी सरकारच्या काळात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.