मोदींनी केलेल्या कामाची देश ७० वर्षांपासून वाट पाहत होता- शहा

कोल्हापुर: कलम ३७० मधील बहुतेक तरतुदी हटवल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. तसेच जम्मू-काश्मीरला भारताच्या मुख्य प्रवाहात जोडण्यासाठी पूर्वीच्या सरकारनी ‘५६ इंच छाती असलेल्या माणसाप्रमाणे’ कधीच धाडस केले नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

विधानसभा निवडणुकांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील मोर्चाला संबोधित करताना शाह म्हणाले, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० मधील बहुतेक तरतुदी हटविल्यानंतर लोकांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारले पाहिजे. तुम्ही एनडीए सरकारच्या निर्णयाचे समर्थन करता का?’ अनेक सरकारे आली आणि गेली, अनेक पंतप्रधान आले आणि गेले. कलम ३७० काढून टाकण्याचे धैर्य कोणालाही दाखवता आले नाही. पण ते फक्त ५६ इंच छाती असलेल्या व्यक्तीने एकाच वेळी पूर्ण केले.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० च्या अंमलबजावणीसाठी त्यांनी विरोधी पक्ष कॉंग्रेसला जबाबदार धरले. शाह म्हणाले, ‘यावर्षी सत्तेत आल्यानंतर मोदींनी असे काही केले की देश ७० वर्षांपासून वाट पाहत होता. त्यांनी ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द केले आणि जम्मू-काश्मीर देशाच्या मुख्य प्रवाहात सामील झाला आहे. दरम्यान, मोदींच्या नेतृत्वात सरकारने घेतलेल्या इतरही अनेक धाडसी निर्णयांची त्यांनी मोजणी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)