देशात एका दिवसात 56,383 रुग्ण बरे

बरे झालेल्या एकूण रुग्णांचा आकडा जवळपास 17 लाख; मृत्यू दर 1.96 टक्के

नवी दिल्ली – देशभरात एका दिवसात सर्वाधिक 56,383 रुग्ण बरे होण्याच्या आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. या आकड्यासह, कोविड-19 च्या बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आज जवळपास 17 लाखावर पोहोचला आहे.

केंद्र सरकारच्या सल्ल्‌यानुसार स्टॅंडर्ड ऑफ केअरच्या माध्यमातून गंभीर स्वरूपाच्या रुग्णांचे प्रभावी क्‍लिनिकल व्यवस्थापन, गृह अलगीकरण यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून चाचण्या, पाठपुरावा करणे आणि प्रभावी उपचारांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.

रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सतत होणाऱ्या वृद्धीमुळे रुग्ण बरे होण्याच्या दराने 70 टक्‍क्‍यांचा टप्पा पार केला आहे, कोविड-19 रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन मृत्यू दर 1.96 टक्‍क्‍यांवर आला आहे.

रुग्ण बरे होण्याच्या विक्रमी नोंदीमुळे देशातील कोविडच्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे आणि सध्या देशात एकूण रुग्णांपैकी 27.27 टक्के सक्रीय कोविड-रुग्ण आहेत. सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.